Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
April 24, 2026
in editor
0
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – रयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी सचिव तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव उपस्थित होते. तसेच जनरल बॉडी सदस्य अमरजीत पाटील, अॅड. गणेश पाटील व ज्योतीराम भायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे डॉ. जे. जी. जाधव यांनी आपल्या भाषणात, ” पारितोषिक वितरण हा केवळ कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कष्टांचा उत्सव असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून सातत्याने प्रयत्न करावेत, अपयशाची भीती न बाळगता पुढे वाटचाल करावी”, असे आवाहन त्यांनी केले. “लहान ध्येय ठेवणे हीच खरी चूक असून मोठ्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करत सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी महाविद्यालयातील ऊर्जावान वातावरण, सक्षम शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग यामुळे संस्थेची प्रगती होत असल्याचे सांगितले. महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, क्रीडा व वाङ्मय महोत्सवांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यापक संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असून शिक्षणासोबत कौशल्यविकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे,” असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय जिमखाना समितीचे प्रमुख डॉ. उमेश साळुंखे यांनी करून दिला. यावेळी मंचावर कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार शिंदे, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. समाधान माने, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे व प्रा. विठ्ठल फुले आदी मान्यवर उपस्थित होते.

या समारंभात राष्ट्रीय, विभागीय व विद्यापीठ स्तरावर विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पीएच.डी., पेटंट व विविध पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड व प्रा. रोहिणी बावचकर यांनी केले.  शेवटी आभार प्रदर्शन प्रा. डॉ अमर कांबळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 25
Previous Post

प्रताप क्रीडा मंडळाच्या मोफत उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ

Next Post

मध्य रेल्वेच्यावतीने ‘पोषण पंधरवड्या’ अंतर्गत पौष्टिक आहार प्रदर्शनाचे आयोजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मध्य रेल्वेच्यावतीने ‘पोषण पंधरवड्या’ अंतर्गत पौष्टिक आहार प्रदर्शनाचे आयोजन

मध्य रेल्वेच्यावतीने 'पोषण पंधरवड्या' अंतर्गत पौष्टिक आहार प्रदर्शनाचे आयोजन

ताज्या बातम्या

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908825

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697