बार्शी –
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव येथे बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री. तुकाराम मोहनराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब, बार्शीचे अध्यक्ष श्री. मंगेश बागुल, विष्णू मस्के, लाईफ वर्कर रयत शिक्षण संस्था सातारा व पानगाव केंद्रप्रमुख सौ. शकुंतला पालके, विश्वनाथ जगताप गुरुजी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्यध्यापक विजयकुमार डुरे पाटील यांनी केले. याप्रसंगी मंगेश बागूल यांनी लायन्स क्लब बार्शीच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी फोल्डर फाइलचे वाटप करण्यात आले
यावेळी प्रसिद्ध निवेदक व कीर्तनकार सौ. इंद्रायणी मस्के यांनी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा, रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीचा तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमास बार्शी तालुक्यातील माजी रयत सेवक ननवरे, सोनवणे, सावंत, रामलिंग बरबडे व विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक दिलीप पाटील तसेच भास्कर पाटील, प्रदीप आण्णा पाटील व इतर माता पालक सरपंच, उपसरपंच व उंडेगाव व रस्तापूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, आजी-माजी विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सेवक नंदकिशोर गायकवाड,नानासाहेब झालटे, चंदना रणदिवे,कलिंदा कांबळे, व बारीकराव देशमुख यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन अनिल डोईफोडे यांनी तर आभार राणी गुंजेगावकर यांनी मानले.
Post Views: 18