माढा : माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अॅड मिनलताई साठे यांची महाराष्ट्र शासनाच्या एकल महिला धोरणासाठी गठित करण्यात आलेल्या सुकाणू समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या शिफारसीनुसार अॅड मिनल साठे या महत्त्वपूर्ण समितीवर निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर स्वतः मंत्री आदितीताई तटकरे यांनी दूरध्वनी करून साठे यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या निवडीची पत्र मिळतात एकल महिलांच्या प्रश्नांना, त्यांच्या हक्कांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितच मी जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणार, असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. या निवडीबद्दल माढा शहर परिसर व सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट…..
मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या शिफारसीने, एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने गठीत केलेल्या सुकाणू समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. त्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाची आणि शासनाची मनापासून आभारी आहे.
या पदावर काम करत असताना एकल महिलांच्या न्याय व हक्कासाठी प्रामाणिकपणे काम करून, माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
अॅड. मिनल साठे
नगराध्यक्षा, माढा
Post Views: 15