बार्शी – लोकसेवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आगळगावच्या असफ मुजावर याने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत ६६ किलो वजनी गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे त्याची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या असफने जिल्हास्तरावरही आपल्या खेळातील कौशल्य, ताकद व आत्मविश्वासाचे दर्शन घडवित प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या या यशामुळे लोकसेवा विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
असफ मुजावर याला वस्ताद अक्षय गिराम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पाटील, जॉइंट सेक्रेटरी ए. पी. देवडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शालेय समिती अध्यक्ष डी. एम. मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रवीण कदम तसेच मुख्याध्यापक सचिन उकिरडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Post Views: 15