सांगोला – श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सांगोल्यातील श्रीराम मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त शहरातील विविध भजनी मंडळांचे भजन, प्रवचन, गीत रामायण, सांगोला शहरातील महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम, भारुड, नाट्य, नृत्य असे विविध कार्यक्रम पार पडले.
गुरुवारी हभप.शुभांगी संतोष कवठेकर यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. त्यांना तबल्याची साथ दत्तात्रय बोत्रे यांनी तर हार्मोनियमची साथ शशिकांत लाटणे यांनी केली. दु.१२ वा. पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी श्रींच्या पालखीची भव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
शुक्रवारी दुपारी महाप्रसादाने जन्मोत्सवाची सांगता झाली. या विविध कार्यक्रमांचा लाभ सांगोला शहर व तालुक्यातील भाविक भक्तांनी घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड.सारंग वांगीकर, नामसाधना मंडळ व श्रीराम महिला भजनी मंडळ सदस्यांनी व श्रीराम भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.


















