Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्जमाफीला वेग; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा न्यायाचा प्रश्न कायम

तरुण भारतbyतरुण भारत
July 27, 2026
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने त्यांच्यात नाराजी वाढत आहे.
जिल्ह्यातील १,०७८ गावांतील पात्र लाभार्थ्यांची नावे सेवा सहकारी संस्था, तलाठी कार्यालये आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. राज्य शासनाने पोर्टलवर नोंद असलेल्या ५९ हजार ८५१ थकीत कर्जदारांपैकी २६ हजार २५३ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविले आहे. यापैकी गेल्या दोन दिवसांत ६ हजार ९३८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण केले असून उर्वरित लाभार्थ्यांनी ३१ जुलैपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार येत्या ४ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, कर्जमाफीचा लाभ वेगाने मिळत असताना वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान अद्याप प्रत्यक्षात मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक शिस्त पाळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आणि थकीत कर्जदारांना तातडीचा लाभ, अशी विसंगती असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी आता अधिक जोर धरत आहे.
चौकट
लाभासाठी हे करा
अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य
आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करा
३१ जुलैपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा
सेवा सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत सुविधा उपलब्ध
चौकट
आधार प्रमाणीकरण पूर्णपणे मोफत
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण कोणतेही शुल्क न देता पूर्ण करावे. ही सेवा आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र आणि संबंधित बँक शाखांमध्ये मोफत उपलब्ध असून कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी केले आहे.
 कोट
“पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ जलदगतीने वितरित करण्यात येईल. आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
मुकुंद पवार, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
Post Views: 74
Previous Post

पीआर कार्ड नव्हे तर मोजणी प्रमाणपत्र वाटप : दावा करणाऱ्यांनी अगोदर “नीट” अभ्यास करावा

Next Post

स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

ताज्या बातम्या

पार्थिव गणेशाची खरी पद्धत सांगतायत पंचांगकर्ते मोहन दाते#solapur

September 13, 2026
विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

September 13, 2026

प्रभाग क्र. ११ कुंभार गल्लीतील वर्षानुवर्षे बंद असलेला बोअर सुरू

September 13, 2026

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

September 13, 2026

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

September 13, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1199792

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!