मंगळवेढा : मंगळवेढा शहरात दोन ठिकाणी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापे टाकून 2 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मोहित कोळी,सुरेश नलवडे या दोघा विरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी पोलीस हवालदार मोहन मनसावले व पोलीस हवालदार सलीम बागवान हे दोघे सोलापूर स्थानिक गुन्हेशाखेकडे कार्यरत असून दि.31 रोजी सायंकाळी 4.50 वाजता शिवप्रेमी चौकातील जुनी भाजी मंडईतील रस्त्याच्या कडेला आरोपी मोहित कोळी हा मटका जुगार खेळताना मिळून आला. त्याच्या कडून रोख रक्कम 1 हजार 100 व पांढर्या रंगाची चिठ्ठी ज्यावर श्री साई कल्याण 31/10 व कागद्याच्या दुसर्या बाजूस श्री साई मिलन डे 31/10 असे मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या मिळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. दुसर्या घटनेत आरोपी सुरेश नलवडे हा शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजार कमानी शेजारी झाडाखाली मटका जुगार खेळताना पोलीसांना मिळून आला. त्याच्याकडून रोख 1 हजार 110 रुपये व पांढर्या रंगाची चिठठी त्यावर 31.10 श्रीराम डे असा मजकूर लिहिलेला मिळून आला. वरील दोघाही आरोपींना ताब्यात घेवून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. याचा अधिक तपास पोलीस हवालदार दत्तात्रय व्हरे हे करीत आहेत. दरम्यान सोलापूरच्या गुन्हे स्थानिक पथकाने मंगळवेढ्यात येवून कारवाई केल्यामुळे येथील स्थानिक पोलीस नेमके काय करतात? याबाबत शंका व्यक्त करीत आश्चर्य व्यक्त केले आहे. येथे डीवायएसपी दर्जाचे एक अधिकारी, पोलीस निरीक्षक दर्जाचे एक अधिकारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक दोन अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक दोन असा फौजफाटा असताना येथील काळे धंदे यांना मंथलीच्या नादात दिसत नाहीत का? असा सुज्ञ नागरिकामधून संतापजनक सवाल करीत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपुर्वक लक्ष घालून अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यावर निलंबनासारखी कारवाई करावी अशी मागणी सद्यस्थितीला होत आहे. अवैध धंदे वाढले की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याची गरज असल्याच्या भावना नागरिकामधून व्यक्त होत आहेत.
Post Views: 4