सोलापूर – कै. सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी ७६ किलोच्या गटात सलामीची लढत अहिल्यानगरची सोनाली मंडलिक आणि सांगलीची अपेक्षा पाटील यांच्यात झाली. मध्यंतरास सोनाली २-० गुणाने आघाडीवर होती. त्यानंतर मात्र विजेतेपदाची दावेदार असलेल्या अपेक्षाने जोरदार मुसंडी मारत ६-३ गुणाने कुस्ती जिंकली.
निर्झरा केअर फाउंडेशनने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर यांच्या सहकार्याने ही स्पर्धा हरिभाई देवकरण मैदानावर आयोजित केली आहे. शनिवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत ५३ किलो गटात सोलापूरची शिवानी करचे हिने पुण्याच्या अवंती रानवडे हिला ६-५ असे हरवले.
दुसऱ्या फेरीत पोहोचलेले गटनिहाय मल्ल :
५० किलो : तेजा मदने (छ. संभाजीनगर), तृप्ती गुरव (कोल्हापूर), आकांशा जाधव, अर्पिता गोळे (पुणे), भाग्यश्री मासुळे (धुळे), गौरी पाटील (कोल्हापूर), अनुष्का हासपे (सातारा), कोमल पटेल (ठाणे).
५३ किलो : श्रावणी लव्हटे (कोल्हापूर), दिव्या धावडे (अहिल्यानगर), सोनामिका पाटील (जळगाव), राजनंदिनी रनवरे (सातारा), मधुरा वाईंगडे (कोल्हापूर), तुळशी पाथरे (नाशिक शहर).
५५ किलो : समृद्धी निलवे (मुंबई उपनगर ).
५७ किलो : सलोनी खोपडे (पुणे), सिमरन कोरी (मुंबई उपनगर), तन्वी मगदूम (कोल्हापूर).
५९ किलो : धनश्री फंड (अहिल्यानगर), निर्मिती मुऱ्हे (पिंपरी चिंचवड), अमेघां घरत (रायगड).
६२ किलो : प्रगती गायकवाड (पिंपरी चिंचवड), संस्कृती शिरसाट (नाशिक), राधिका ढेरे, राधिका ढेरे (कोल्हापूर).
६५ किलो : दिव्या कुंभार,विशाखा चव्हाण ( पुणे ), अश्विनी गर्जे (बीड).
६८ किलो : शिवानी मेटकर (कोल्हापूर), आराधना नाईक (सांगली).
७२ किलो : सावरी सातकर (पुणे), वेदांतिका पवार (सातारा).
७६ किलो महाराष्ट्र केसरी गट : वेदिका ससाणे, सृष्टी भोसले (कोल्हापूर), प्रतीक्षा बागडी (सांगली).


















