Monday, May 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा डंका, पुरुष गटात रेल्वेची बाजी

तरुण भारतbyतरुण भारत
January 16, 2026
in india
0
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काझीपेठ (तेलंगणा) : काझीपेठयेथील रेल्वे ग्राऊंडवर रंगलेली ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत थरारक ठरली. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या महास्पर्धेत महाराष्ट्राच्या रणरागिणींनी महिलांच्या गटात अजिंक्यपदाचा झेंडा फडकावला, तर रेल्वेच्या शिलेदारांनी पुरुष गटात आपले वर्चस्व सिद्ध केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाला नमवले, तर पुरुषांच्या अंतिम लढतीत रेल्वेने महाराष्ट्रावर रोमहर्षक विजय मिळवला. या स्पर्धेत धाराशिव, महाराष्ट्राच्या संध्या सुरवसेला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, तर रेल्वेच्या रामजी कश्यपला (सोलापूर) एकलव्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महिलांमध्ये महाराष्ट्राचे हे २७ वे, तर पुरुषांमध्ये रेल्वेचे १३ वे अजिंक्यपद ठरले.

 

महिलांचा थरार: महाराष्ट्राच्या रणरागिणींनी राखले वर्चस्व, महिला गटात महाराष्ट्राच्या अजिंक्यपदाचा धडाका कायम

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर २३–२२ असा १ गुणाने थरारक विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात प्रियंका इंगळे (२.१० मि. संरक्षण व १० गुण), संध्या मोरे (२.४० मि. संरक्षण), संध्या सुरवसे (२.३० मि. संरक्षण) आणि अश्विनी शिंदे (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक योगदान दिले. पराभूत ओडिशाकडून अर्चना प्रधान (२.१० मि. संरक्षण व २ गुण), अर्चना माझी (नाबाद १.५० मि. संरक्षण), मधुस्मिता ओझा (१.४० मि. संरक्षण व २ गुण) आणि शोभाश्री सिंग (१.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी जबरदस्त लढत दिली; मात्र त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.

 

पुरुषांचा महाअंतिम सामना: रेल्वेची विजयी धडाकेबाजी

पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राचा २६–२१ असा ५ गुणांनी पराभव करत जेतेपद पटकावले. मध्यंतराला रेल्वे संघ १४–११ ने आघाडीवर होता. विजयी रेल्वे संघाकडून रामजी कश्यप (नाबाद २.३० मि. संरक्षण व २ गुण), महेश शिंदे (१.४० मि. झुंज), जगन्नाथ दास (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), अरुण गुणकी (१.३७ मि. संरक्षण व २ गुण) आणि अभिनंदन पाटील (४ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राकडून प्रतीक वाईकर (१.५५ मि. संरक्षण व २ गुण), अनिकेट चेंदवणकर (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) आणि शुभम उतेकर (नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी झुंजार खेळ केला.

 

उपांत्य फेरीतील धमाका: महाराष्ट्राचा पुरुषांमध्ये कोल्हापूरवर तर महिलांमध्ये दिल्लीवर एकतर्फी विजय  

पुरुषांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कोल्हापूरवर २९–२७ असा २ गुणांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रेल्वेने ओडिशाचा २५–१७ असा ८ गुणांनी पराभव केला. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने दिल्लीवर २७–०६ असा एक डाव व २१ गुणांनी दणदणीत विजय नोंदवला, तर ओडिशाने विमान प्राधिकरणावर २७–१९ असा ८ गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

स्पर्धेतील मानकरी: उत्कृष्टतेचा गौरव

महिला गट:

राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – संध्या सुरवसे (महाराष्ट्र)

सर्वोत्कृष्ट संरक्षक – अर्चना प्रधान (ओडिशा)

सर्वोत्कृष्ट आक्रमक – प्रियंका इंगळे (महाराष्ट्र)

 

पुरुष गट:

एकलव्य पुरस्कार – रामजी कश्यप (रेल्वे)

सर्वोत्कृष्ट संरक्षक – प्रतीक वाईकर (महाराष्ट्र)

सर्वोत्कृष्ट आक्रमक – अभिनंदन पाटील (रेल्वे)

आपला विश्वासू

बाळ तोरसकर (९८६९१३५०८३)

(सहसचिव, महाराष्ट्र खो खो असोसिएशन)

Post Views: 103
Previous Post

भारतीय रस्त्यांवर किया इंडियाच्या ५ लाख कनेक्टेड कार्स

Next Post

मतदान केंद्रांत मतदारांची संख्या कमी तर केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची वर्दळ जास्त 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मतदान केंद्रांत मतदारांची संख्या कमी तर केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची वर्दळ जास्त 

ताज्या बातम्या

पोतदार बाईच्या सेवा निवृत्तीमुळे चिमुकल्याचे डोळे पाणावले

पोतदार बाईच्या सेवा निवृत्तीमुळे चिमुकल्याचे डोळे पाणावले

May 4, 2026
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व उज्वला शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक कापून उत्साहात साजरा

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व उज्वला शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक कापून उत्साहात साजरा

May 4, 2026
भाविकांच्या सोयी सुविधांना व  सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे प्राधान्य 

भाविकांच्या सोयी सुविधांना व  सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे प्राधान्य 

May 4, 2026
मित्राला पोलीस तक्रारीचा सल्ला दिला म्हणून ३१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

मित्राला पोलीस तक्रारीचा सल्ला दिला म्हणून ३१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

May 4, 2026
पं शौनक अभिषेकी यांच्या गायनाने आणि यशवंत वैष्णव यांच्या दमदार तबलावादनाने कलारसिक मंत्रमुग्ध

पं शौनक अभिषेकी यांच्या गायनाने आणि यशवंत वैष्णव यांच्या दमदार तबलावादनाने कलारसिक मंत्रमुग्ध

May 4, 2026
“नसरापूरच्या नराधमाला भर चौकात फाशी द्या, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही!”

“नसरापूरच्या नराधमाला भर चौकात फाशी द्या, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही!”

May 4, 2026
न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा ! महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा ! महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

May 4, 2026
माझ्या वाट्याला कधी समीक्षा आलीच नाही” — मेघना पेठे

माझ्या वाट्याला कधी समीक्षा आलीच नाही” — मेघना पेठे

May 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0845097

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697