सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरातील नागरी वसाहतीमध्ये अनेक विनापरवाना वीट भट्ट्या चालू असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून वीटभट्ट नष्ट करण्याबाबत राष्ट्रीय छावा संघटनेने उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील आणि सोलापूर जिल्हा खनीकर्म अधिकारी यांच्याकडे लिखित तक्रार दिली होती..
अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात अनेक अनधिकृत व बेकायदेशीर वीट भट्ट्या सुरू असून, तेथे हजारो ब्रास माती साठवून ठेवलेली आहे, आणि लाखो विटांचा साठा उपलब्ध आहे, अनेक वीट भट्टी चालक विनापरवाना वीट भट्टी चालवत आहेत तसेच भरलेल्या रॉयल्टी पेक्षा अधिक माती साठवून ठेवलेली आहे, वीट भट्टी चालकांनी प्रदूषण मंडळाची परवानगी घेतलेली नाही, विटा वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना घेतलेला नाही, नागरी वसाहती मधील वीट भट्ट्यामुळे वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून, नागरिकांना त्वचेचे आणि डोळ्याचे विकार होत आहेत त्यामुळे अशा अनधिकृत आणि बेकायदेशीर चालणाऱ्या वीट भट्ट्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची तक्रार राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पारवे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष रतिकांत पाटील यांनी तक्रार दाखल केली होती..
तक्रारीच्या अनुषंगाने केलेला पंचनामा
पंचनामा करताना मंडल अधिकारी आणि तलाठी यांना अनधिकृत मातीचा साठा, अनधिकृत वाहतूक, महसूल परवाना, भरलेल्या रॉयल्टी च्या पावत्या, आढळून आल्या नाहीत, तसेच मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचे दिसून आले त्यामुळे वीट भट्टी चालकावर खालील प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
1) वीरेश आवटे- 1,33,725 रुपये दंड.
2) संतोष मोहरकर – 1,67,025 रुपये दंड.
3) अशोक होनमाने – 1,33,725 रुपये दंड.
4) बसवराज पाटील-3,33,525 रुपये दंड.
5) ओमकार दीक्षित – 1,67,025 रुपये दंड.
6) सुनील तंबाके- 6,66,525 रुपये दंड.
7) चांद नदाफ- 1,33,725 रुपये दंड.
8) श्रीशैल कुंभार- 2,66,925 रुपये दंड.
9) परशुराम वाघमारे- 1,67,025 रुपये दंड.
अशाप्रकारे एकूण 9 वीट भट्टी चालकांना छावा संघटनेने केलेल्या तक्रारीवरून एकूण 21,69,225 रुपयांचा दंड उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केलेला आहे.
Views: 37