सोलापूर – सद्यस्थितीत समाजातील व राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करता व वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थिनींना केवळ मानसिक व बौद्धिकदृष्ट्याच नव्हे, तर शारीरिकदृष्ट्याही सक्षम बनवणे काळाची गरज बनली आहे अशा मागणीचे निवेदन अभिनव सामाजिक संस्था सोलापूर अध्यक्ष मिनल ताई दास यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील नायब तहसीलदार स्मिता पाटील यांना देण्यात आले.
या मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री यांना देण्याची विनंती करण्यात आली.राज्यामध्ये तसेच देशात मुलींवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावरील (पहिली ते सातवी) मुलींना लहानपणापासूनच स्वतःचे रक्षण कसे करावे, याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, त्यांना नियमितपणे शारीरिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे.या अनुषंगाने खालील मागण्या करण्यात आल्या.
अनिवार्य प्रात्यक्षिक प्रशिक्षण: राज्यातील सर्वच शासकीय निमशासकीय तसेच खाजगी शाळेतील पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थिनींसाठी स्वयंरक्षण प्रशिक्षण पूर्णपणे अनिवार्य करण्यात यावे. ज्या शाळा याचे पालन करणार नाहीत त्यांची मान्यता काढून घेण्यात यावी.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मीनल दास, सरोजिनी माकाई, अनिता वाघमारे, जयश्री रानसरजे, अफ्रिन पटेल, अरुणा जाधव, सविता आईवळे, विद्या दीक्षित, ज्योती जाधव आदी उपस्थित होते.


















