बार्शी – यशवंत शैक्षणिक समितीच्यावतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
हा सत्कार समारंभ रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वा. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहामध्ये पार पडणार आहे.
१० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेत ७५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले धनगर समाजातील सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी या सत्कारासाठी पात्र असतील. नाव नोंदणीसाठी गुणपत्रक (Mark sheet) आणि शाळा सोडल्याचा दाखला (LC). द्यावा ही नावनोंदणी १५ जुलै २०२६ पर्यंत
या व्हॉट्सॲप क्रमांक- १) श्री शंकर कोळेकर – ९८८१६९३१९७, २) प्रा. उत्तमराव हुंडेकर – ९८५०६६९६६६, ३) प्रा. डॉ. नागनाथ धायगोडे – ९८६०१३६७४३, ४) प्रा. शावरू जडगे – ९४२२४६०४१६
५) बाळकृष्ण वाघमोडे – ९९७०१७५७४० यांचेकडे करावी, असे आवाहन यशवंत शैक्षणिक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Post Views: 21