Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे तीव्र आंदोलन; गणेश मूर्ती हटवण्यासाठी ७ दिवसांची मुदत

तरुण भारतbyतरुण भारत
July 2, 2026
in marathwada
0
दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे तीव्र आंदोलन; गणेश मूर्ती हटवण्यासाठी ७ दिवसांची मुदत
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
​
अक्कलकोट – स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केल्याच्या निषेधार्थ म्हेत्रे समर्थकांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले.
१२:२० वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल ६ तास चालले.प्रशासनाने येत्या ७ दिवसांत संबंधित गणेश मूर्ती तिथून हटवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील,असा कडक इशारा शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांनी दिला आहे.
      बाजार समितीच्या कार्यालयाशेजारी स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा पुतळा बसवण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने चबुतरा उभारला होता, ज्याचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले होते. मात्र, पंचवार्षिक निवडणुकीत म्हेत्रे यांची बाजार समितीवरील सत्ता गेल्यानंतर, विद्यमान संचालक मंडळाने हा चबुतरा पाडला.बाजार समितीचे सचिव, सभापती, उपसभापती आणि संबंधित संघटनेच्या अध्यक्षांवर ३० जूनपर्यंत गुन्हा दाखल करावा,
अन्यथा १ जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा
म्हेत्रे समर्थकांनी लेखी पत्राद्वारे प्रशासनाला दिला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे म्हेत्रे समर्थक रस्त्यावर उतरले होते.
​     सकाळी १२ वा. २० मि.  सुरू झालेले हे आंदोलन दुपारनंतरही बराच वेळ सुरू होते. या आंदोलनात सुमारे ५०० हून अधिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.​परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये ६ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी आणि आरसीपी पथकाचे २० जवान तैनात होते.आंदोलनास्थळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर, डीवायएसपी (DySP) राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर, तसेच सहाय्यक निबंधक अधिकारी राहुल ठोंबरे, सहाय्यक सहकारी अधिकारी अनिल मदने, सहकारी अधिकारी (श्रेणी २) एस. व्ही. कुंभार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
     या आंदोलनात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे, नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, नगरसेवक बसवराज हौदे, माजी सभापती आनंदराव सोनकांबळे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, बाजार समिती संचालक शिवानंद पाटील, संचालक इरण्णा धसाडे, सातलिंगप्पा परमशेट्टी, रोप निंबाळकर, बसवराज परमशेट्टी, संगमेश सिन्नर, विश्वनाथ म्हेत्रे, बाबू कोळी, चंद्रकांत यगदी, सिद्धाराम यगदी, अशोक ढंगापुरे, पंचायत समिती सदस्य भीमण्णा सोलापुरे, रामा गर्दी आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
​स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला जात होता. या संदर्भात म्हेत्रे समर्थकांनी  उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार देऊन बाजार समितीचे सचिव, सभापती, उपसभापती आणि संघटनेच्या अध्यक्षांवर ३० जूनपर्यंत गुन्हा दाखल करावा, अन्यथा १ जुलै रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम्ही लेखी पत्राद्वारे दिला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरावे लागले. आता प्रशासनाने येत्या ७ दिवसांत ती गणेश मूर्ती व मंदिर तिथून हटवण्याचे आश्वासन दिले आहे. जर दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही, तर आम्ही दुधनी मार्केट कमिटी पूर्णपणे बंद पाडू शंकर म्हेत्रे
Post Views: 5
Previous Post

दारू विक्रीवर कठोर कारवाई करा अन्यथा घरात जाऊन बाटल्या फोडू

Next Post

“अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज”: माजी आमदार प्रशांत परिचारक; पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
“अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज”: माजी आमदार प्रशांत परिचारक; पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण

"अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज": माजी आमदार प्रशांत परिचारक; पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण

ताज्या बातम्या

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

July 2, 2026
डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेवर ‘आदर्श शाळा’ पुरस्काराची मोहोर गुणवत्तेचा गौरव 

July 2, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

July 2, 2026

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन सन्मान योजनेंतर्गत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

July 2, 2026
हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0954313

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!