मंगळवेढा –
श्री बसवेश्वराच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या बोराळे नगरीत अवैद्य धंद्याचा बोजवारा वाढला असून अनेक निष्पाप युवक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अवैद्य दारू विक्रीमुळे अनेक संसार उघड्यावर आले,कर्जबाजारी झाले,तरीही अवैध्य व्यवसायाचा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढतच आहे.यासाठी संबंधित प्रशासनाने येथे आठ दिवसात बोरळे गावातून अवैध धंदे दारू विक्री बंद करा अन्यथा महिलांचा मोर्चा थेट घरात घुसून बाटल्या फोडतील असा खणखणीत इशारा आज घेतलेल्या मोर्चा प्रसंगी कवचाळे यांनी दिला.
बोरोळे पंचक्रोशीतील शेकडो महिलांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सदस्या जयश्री संजीव कवचाळे यांच्या पुढाकारातून अवैद्य धंद्याच्या विरोधात गावातून भव्य अशी रॅली काढली. पीडित महिलांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचावा, बोराळे गावातून अवैद्य धंदे कायमचे हद्दपार व्हावेत, असे निवेदन देऊन गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितित महिलांनी मागणी केली.
गेल्या अनेक वर्षापासून बोराळे पंचक्रोशीला अवैध धंद्याने पूर्णता वेढले आहे. यामुळे महिलांचे जीवन मेताकुठीला आले आहे.
या पुढील काळात अवैध धंद्याला कोणी थारा देऊ नका, युवकांनी व्यसनाधीश होऊ नका, आपले कुटुंब सक्षम व मजबूत होण्यासाठी महिलांच्या या मागणीला सर्वांनी साथ द्यावी अशी मागणी याप्रसंगी कवचाळे यांनी बोलताना व्यक्त केली.
आज बोराळा येथे अवैद्य धंद्याच्या विरोधात उठलेला आवाज पाहून पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई करावी अन्यथा बोराळे गावच्या मोर्चाचे पडसाद संपूर्ण तालुका भर दिसेल अशी चर्चा वाढत आहे.
Post Views: 14