Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधानपरिषद निवडणुकीत मनसेची उडी, भाजपच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर, अभिजित पानसेंना तिकीट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 27, 2024
in maharashtra
0
विधानपरिषद निवडणुकीत मनसेची उडी, भाजपच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर, अभिजित पानसेंना तिकीट
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकांचा निकाल बाकी असतानाच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार मतदारसंघातील निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. तर मुंबई पदवीधर मतदारसंघावर महायुतीतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. अशातच युतीत बाहेरुन सहभागी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही भाजपच्या जागेवर उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे यांचे नाव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पानसे हे मनसेचे उमेदवार की महायुतीचे, हे कोडे निर्माण झाले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निरंजन डावखरे विधानपरिषद आमदार आहेत. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचं तिकीट फिक्स मानलं जात होतं. अशातच भाजपच्या मतदारसंघात मनसेने उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे आता भाजप डावखरेंचं तिकीट कापणार, की कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

 

कोण आहेत अभिजीत पानसे ?

अभिजित पानसे हे मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. ते राज ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात. पानसे हे व्यवसायाने निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकही आहेत. रेगे, ठाकरे, रानबाजार यासारखे त्यांचे चित्रपट आणि वेब सीरीज गाजले आहेत. अभिजीत पानसेंच्या उमेदवारीमुळे मनसेला कोकणात जम बसवण्यास मदत होईल असे मानले जाते. गेल्या काही काळात मनसेकडून लढवली जाणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे.

निरंजन डावखरेंचा पत्ता कट ?

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होते. ते राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे सुपुत्र आहेत. २०१२ मध्ये निरंजन हे राष्ट्रवादीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर गेले होते. २०१८ च्या विधानपरिषद निवडणुकांआधी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून तिकीट जाहीर झाले होते. डावखरे ठाणे भाजपचे प्रमुख असून त्यांच्या अखत्यारित ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे भाग येतात. निरंजन डावखरे हे वडिलांप्रमाणेच सर्वपक्षीय संबंध जपण्यात कुशल मानले जातात.

Post Views: 28
Previous Post

दहावीच्या निकालात यंदा कोणी मारली बाजी, पाहा लाइव्ह

Next Post

खोटा विवाह करुन देऊन एका कुटुंबाची सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठकसेनी’ टोळीच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
खोटा विवाह करुन देऊन एका कुटुंबाची सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठकसेनी’ टोळीच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटा विवाह करुन देऊन एका कुटुंबाची सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठकसेनी' टोळीच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878830

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697