Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खोटा विवाह करुन देऊन एका कुटुंबाची सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठकसेनी’ टोळीच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 27, 2024
in solapur
0
खोटा विवाह करुन देऊन एका कुटुंबाची सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठकसेनी’ टोळीच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
264
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह योग्य वधूच्या शोधात असलेल्या वराचा विवाह करुन देतो, अशी थाप मारत ‘ठकसेनी’ टोळीनं खोटा विवाह करुन देऊन एका कुटुंबाची ३, २१,००० रुपयांची फसवणूक केलीय. ही धक्का देणारी घटना मोहोळ तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडलीय. ही टोळी तो कित्ता गिरवत आणखी एका कुटुंबाला ‘चुना’ लावण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलीसांना कळवून शनिवारी, २५ मे रोजी फसलेल्या कुटुंबानं मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केलंय. या फसवणूक प्रकरणी ०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, मोहोळ तालुक्यातील सचिन नावाचा तरुण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत वायरमन म्हणून काम करीत आहे, त्याच्या विवाह विचार करून ते कुटुंबीय त्यास वधू शोधत होते, तो तिशीकडे वाटचाल करीत असूनही त्याचे लग्न जमत नव्हते.

 

त्यामुळं त्याच्या भावानं मावस भावाकडं एखादं स्थळ बघण्यास सांगितलं होतं. त्याने लग्न जमविणारा नांदेड जिल्ह्यातील एजंट गंगाधर लाडबा ढेरे (रा. कोळेगांव (बु) ता. भोकर) याचा संपर्क नंबर दिला. त्यांनी त्यास संपर्क साधल्यावर त्यानं मुलगी उपलब्ध आहे, परंतु तिच्याबरोबर लग्न जमले तर तुम्हांला रोख रक्कम २, ५०, ००० रुपये आणि गाडी भाड्यापोटी रक्कम रुपये ११, ००० रुपये असे एकूण २, ६१, ००० रुपये द्यावे लागतील, अशी अट घालून त्यांनी मोबाईल व्हॉटस्अॅपवर मुलीचे फोटो पाठवून दिले. इथूनच ‘ लग्नासाठी काय पण ‘ या नाट्यास प्रारंभ झाला. वधूच्या शोधात असलेल्या घरातील सर्वांनी चर्चा करुन मुलगी पसंत आहे, असे सांगून ते त्यांना अटी नुसार ठरलेली रक्कम देण्यास तयार झाले. त्याप्रमाणे ०२ एप्रिल २०२४ रोजी मुलगी विशाखा व तिचा भाऊजी शौलेश, मावशी म्हणून निर्मला, महिला एजंट लता पदक व त्यांचे सोबत अनोळखी दोन महिला हे सर्वजण चारचाकी गाडी करुन विवाहोत्सुक मुलाच्या गांवी दुपारी आले.

 

त्यांनी मुलीचा विशाखा श्रीकृष्ण छापानी (रा. नया अकोला) असा परिचय दिला. त्यानंतर बोहल्यावर चढण्याची घाई असलेल्या नवऱ्या मुलाच्या घरी नातेवाईक व घरातील लोकांची बैठक झाली. त्यांना ठरल्याप्रमाणे रोख रक्कम देण्याचे व तसेच त्याच दिवशी लग्न करण्याचे ठरले. त्याप्रमाणे ०२ एप्रिल रोजी महिला एजंट लता पदक हिचे सांगण्यावरुन तिच्या फोन पे वर वेगवेगळ्या अकाउंट नंबरवरून २, ४१, ००० रूपयांची रक्कम वधू पक्षाला दिली. अटीप्रमाणे ठरलेली रक्कम मिळाल्यावरच त्यांनी त्याच दिवशी ०२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०६.३० वा. चे सुमारास मौजे देगांव (वा) येथे नवरा मुलाच्या राहते घरी घरगुती पध्दतीने लग्र पार पडले. त्यानंतर पाहुणचार झालेनंतर तिचे सोबत आलेले नातेवाईक रात्री विशाखाला सासरी सोडून परतीच्या वाटेला लागले. १० एप्रिल रोजी विशाखा हिचे कथित भाऊजी शैलेश यांने, त्यांचे घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असून विशाखाला घेऊन या व लगेच कार्यक्रम संपल्यावर परत माघारी घेऊन जा, असं म्हटले.

 

तिचे सासरे घरच्या लक्ष्मी, विशाखाला सोबत घेऊन, १३ एप्रिल रोजी रात्रौ सोलापूर येथून खुराणा ट्रॅव्हन्सने बसून दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूर हायवेवर उतरले. त्यावेळी तेथे विशाखाचा भाऊजी शौलेश हा आला होता. त्याने त्या दोघांना रिक्षा करुन अकोला बस स्टॅण्डवर नेले. तेथे स्टॅण्डवर विशाखा ही वडीलांना मला बाथरुमला जायचे आहे, असे सांगून तेथून निघून गेली. त्यावेळी तिचा भाऊजी शौलेश हा आपल्याला घरी जाण्यासाठी बाहेर गाडी येणार आहे, ती आली का बघून येतो, म्हणून गेला, तो परत आलाच नाही. सून विशाखाचा अकोला स्टॅण्ड परिसरात व आजूबाजूला शोध घेतला, परंतु ती ही मिळून आली नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर आठवड्याच्या सासऱ्यानं गांव गाठलं. नववधू विशाखा घरातून जाताना, तिच्या अंगावर सोन्याचे दागिने फुले-झुबे व मंगळसूत्र असे दोन्ही मिळून एक तोळा सोने व चांदीचे पैंजन ७० ग्रॅम, पायातील जोडवी २० ग्रॅम असे दागिने एकूण किंमत ५३, ००० रुपयांचे व घरात ठेवलेली रोख रक्कम २७, ००० रुपये (अक्षरी सत्तावीस हजार रुपये) घेऊन गेल्याचे स्पष्ट झालंय. त्या महिलांचा आम्ही आजपावेतो शोध घेतला, परंतु त्यांच्याबाबत काही माहिती मिळाली नाही, अगर त्या मिळून आल्या नाहीत. भोसले परिवाराची फसवणूक केलेल्या महिला मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील नक्षत्र मंगल कार्यालय येथे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडीच्या भोसलेला ‘ चुना ‘ लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे अगोदर फसलेले भोसले परिवारानं नक्षत्र मंगल कार्यालयात धडक मारली.

 

तिथं ती टोळी असल्याचे दृष्टीस येताच हा प्रकार, शनिवारी २५ मे रोजी पोलिसांना कळवून त्यांना पोलीस ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भोसलेनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी विशाखा श्रीकृष्ण छापानी (रा. नया अकोला, अमरावती), तिचा भाऊजी शौलेश (पूर्ण नांव पत्ता नाहित नाही), मावशी निर्मला बावीस्कर (रा. उल्हासनगर), महिला एजंट लता पदक (रा. राजोरा, संभाजीनगर), पिंकी अशोक ढवळे (रा. उल्हासनगर) आणि लता धनराज चव्हाण रा. डोंबीवली जि. ठाणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार/७०९ आदलिंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Post Views: 34
Previous Post

विधानपरिषद निवडणुकीत मनसेची उडी, भाजपच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर, अभिजित पानसेंना तिकीट

Next Post

अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 28 मे ते 12 जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्याद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 28 मे ते 12 जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्याद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार

अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 28 मे ते 12 जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्याद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878776

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697