सांगोला – दि.२३ डिसेंबर रोजी सुर्योदय मोबाईल शॉपी, वासुद चौक, सांगोला येथील दुकानाच्या वरील पत्रा उचकटुन पीओपी तोडुन आत प्रवेश करून ३ लाख ९० हजार ५०० रु. किंमतीचे वेगवेगळे मोबाईल फोन चोरी झाले होते. याबाबत सांगोला पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी सांगोला पोलिसांनी दि.२४ मार्च रोजी एक मोबाईल ट्रेस करून त्याची पुर्ण माहिती घेवून कर्नाटक राज्यातील बागलकोट येथून आरोपी अक्षय शांताराम इंदुलकर (वय-३६) रा.नवा नगर, बागलकोट यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याचेकडून अंदाजे किंमत ३ लाख ३० हजार रुपयांचे एकुण २० मोबाईल असा मुद्देमाल मिळाला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.दत्ता वजाळे, विशाल भोसले, पोकॉ.शहाजहान शेख व सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ.राहुल सोनकर यांनी केली.
















