सांगोला – सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असून चेअरमनपदी चंद्रकांत जाधव, व्हा.चेअरमनपदी प्रशांत धावणे तर सचिवपदी वासुद (ता.सांगोला) येथील सहा.कृषी अधिकारी बाळासाहेब भीमराव सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे एकूण ६६२ सभासद असून भागभांडवल सुमारे १५ कोटी रुपये आहे. सभासदांना अधिक सुलभ व पारदर्शक सेवा देण्यावर भर राहणार असल्याचे बाळासाहेब सावंत यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


























