Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अयोध्येत फक्त श्रीरामच येणार नाहीत, तर 85 हजार कोटी रुपयेही येणार….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 6, 2024
in india
0
अयोध्येत फक्त श्रीरामच येणार नाहीत, तर 85 हजार कोटी रुपयेही येणार….
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अयोध्येत ‘श्री राममंदिर’ (Ram Mandir) उभारणीला सुरुवात झाली तेव्हापासून या शहराच्या विकासात (Development) मोठी भर पडली आहे. अयोध्येच मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरु आहेत. दरम्यान, सध्या लोक 22 जानेवारीची वाट पाहत आहेत, त्या दिवशी ‘श्री रामजन्मभूमी मंदिर’चे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत. लोक याकडे प्रभू रामाचे अयोध्येतील पुनरागमन म्हणूनही पाहत आहेत. पण खर्‍या अर्थाने केवळ श्रीरामच ‘राममंदिरात परतणार नाहीत, तर याचबरोबर अयोध्येत 85,000 कोटी रुपये येणार आहेत. नेमकी संपूर्ण योजना काय? ते सविस्तर पाहुयात.

धार्मिक पर्यटनाला चालना
अयोध्येत सुरू होणारे राम मंदिर हे देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र तर आहेच, शिवाय या प्रदेशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठीही ते विशेष आहे. राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळेच पायाभूत सुविधांपासून ते हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी क्षेत्रापर्यंतच्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.

अयोध्येत विकासाची नवी गाथा
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या नवीन रेल्वे स्टेशन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी अयोध्या क्षेत्रासाठी 15,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अयोध्येला आधुनिक स्वरूप प्राप्त होईल.

अयोध्येला ‘ग्लोबल मेगा टुरिस्ट सिटी’ बनवण्याचा निर्णय
अयोध्येतील ‘श्री रामजन्मभूमी मंदिरा’च्या उद्घाटनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. काही लोक याकडे प्रभू श्री रामाचे अयोध्येला परतणे म्हणूनही पाहत आहेत. पण राम मंदिरात केवळ श्रीरामच परतणार नाहीत, तर अयोध्येच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 85,000 कोटी रुपये येणार आहेत. राम मंदिर परिसराव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारने अयोध्येची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक प्रकल्पांना निधी दिला आहे. यामुळे अयोध्या आजूबाजूच्या क्षेत्रासाठी एक मोठे आर्थिक केंद्र बनेल आणि तेथील अर्थशास्त्र बदलेल. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येला ‘ग्लोबल मेगा टुरिस्ट सिटी’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

85,000 कोटी रुपयांची ही योजना काय?
अयोध्येच्या मास्टर प्लॅन-2031 नुसार त्याचा पुनर्विकास 10 वर्षात पूर्ण होईल. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दररोज सुमारे 3 लाख पर्यटक अयोध्येत पोहोचण्याची अपेक्षा आहे. इतक्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येथील पुनर्विकासावर सुमारे 85 हजार कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. अयोध्येला जागतिक शहर बनवण्यासाठी दिक्षू कुकरेजा यांनी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. राम मंदिर उघडल्यानंतर एका नागरिकामागे 10 पर्यटकांचे प्रमाण असेल. त्यामुळे याठिकाणी शासकीय गेस्ट हाऊस, हॉटेल, व्यापारी संकुले विकसित करण्यात येणार आहेत. हे प्रत्येक प्रकारच्या पर्यटकांच्या गरजा पूर्ण करतील.

केंद्र आणि राज्य सरकारच्या 37 एजन्सी अयोध्येत काम करतायेत
केंद्र आणि राज्य सरकारच्या 37 एजन्सी अयोध्येला नवे रूप देण्यासाठी आधीच कार्यरत आहेत. यासाठी सुमारे 31,660 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. NHAI 10,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हाताळत आहे. उत्तर प्रदेश सरकार आधीच 75,00 कोटी रुपयांच्या सुमारे 34 प्रकल्पांवर काम करत आहे. तर विमानतळ, रेल्वे आणि महामार्गाचा विकास स्वतंत्रपणे होत आहे.

व्यवसायातही भरभराट
श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा सांगतात की, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आजूबाजूच्या भागात आर्थिक घडामोडी वाढतील. आता पैसा आला तर व्यवसाय करण्यापासून रोजगारापर्यंतच्या संधी वाढतील. ताज, रॅडिसन आणि आयटीसी सारखे लक्झरी ब्रँड अयोध्येत हॉटेल्स उघडण्यासाठी येत आहेत. तर ओयो सारखे बजेट हॉटेल ब्रँड्सही येथे पोहोचले आहेत. त्याचबरोबर बिसलेरी, पार्लेजी आणि कोका-कोला या कंपन्याही या भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात प्लांट उभारण्यावर भर देत आहेत.

 

Post Views: 86
Previous Post

ग्रामीण विकास संस्था, पौनीतर्फे आनंदम विद्यालयाचे उद्घाटन करताना….

Next Post

पहा – पंतप्रधान मोदींची लक्षद्वीप भेट: बेटांचे विलोभनीय सौंदर्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये घेतला स्नॉर्कलिंगचा आनंद; शेअर केले आपल्या ‘उत्साही अनुभवाचे’ फोटो

पहा - पंतप्रधान मोदींची लक्षद्वीप भेट: बेटांचे विलोभनीय सौंदर्य

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1244718

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!