सोलापूर – सीबीएसई माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून सोलापूर शहरातील सीबीएसई पॅटर्न मध्ये नावलौकिक प्राप्त नागेश करजगी ऑर्किड स्कुलने विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये स्कुलमधील कु.आरुषी उत्सुरगे ९९.६०%, यशराज भोसले ९९% ,पलक छाजेर ९८.८%, ओंकार मेहता ९८% , वरद बिनगे ९७.८%, इरफान पठाण ९७.६%, पूर्वा कोचर ९७.४%, मानसी मोरे ९७.४ %, अनिशा बंडगुल ९७.२%, दिव्या चव्हाण ९६.४%, प्रथमेश गुंड ९६.२%, अमानअली शेख ९५.४%, आर्या चंडक ९५.४% यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले आहे. तसेच इंग्रजी, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान व मराठी विषयात एकूण ३९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.
३१ विद्यार्थ्यांनी ९०% हून अधिक गुण मिळविले आहेत, तसेच ७३ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८०% गुण मिळविले आहेत. एकूण १२७ विद्यार्थ्यांनी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण होवून शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्राचार्या रुपाली हजारे व सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी परिश्रम घेतले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी ,सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे यांनी अभिनंदन केले.

























