वेळापूर – माळशिरस येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरासमोर शिवशंभो प्रतिष्ठान व डीजे कंपनी 46 यांच्यावतीने जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, मदनसिंह माने देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे यांच्यासह शिवशंभो प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर वटेश्वर मंदिर वेळापूर या ठिकाणी देखील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
पालखी चौक वेळापूर या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचशील नगर, शिवशंभो प्रतिष्ठान, रमापती प्रतिष्ठान, रौद्रशंभो प्रतिष्ठान चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पिसेवाडी येथे मावळा प्रतिष्ठान व सत्यशोधक प्रतिष्ठान पिसेवाडी यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पिसेवाडी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : वेळापूर येथे शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करताना पदाधिकारी.

























