पंढरपूर – येथील युवा,सर्जनशील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा घबाडकुंड हा मराठी सस्पेन्स, हॉरर , कॉमेडी मराठी चित्रपट शुक्रवार दी १९जून रोजी महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित होत असून पंढरपूर सारख्या ग्रामीण भागातून एक उदयोन्मुख युवा दिग्दर्शक सोलापूर जिल्ह्याचे नाव उंचीवर नेत असल्याने पंढरपूर शहरात सागर जाधव या युवकाचे कौतुक होत आहे,
सागर जाधव यांना बालपणा पासूनच सिने क्षेत्राचे आकर्षण आणि औत्सुक्य होते. सागर यांनी बाहुबली १, वेडात वीर दौडले सात, एलिझाबेथ एकादशी, रिंगण, जिगरिया (हिंदी), कन्यारत्न आदी सिनेमात अभिनय केला आहे. मात्र सहाय्यक दिग्दर्शक म्हणून घबाडकुंड हा पहिलाच चित्रपट असल्याचे सागर यांनी सांगितले.
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील हे असून पुणे येथील लोणी काळभोर परिसरातील डोंगराळ भागात, निबीड जंगलात या सिनेमाचे सलग चित्रीकरण करण्यात आले आहे.
हा चित्रपट हिंदी भाषेत देखील डब करण्यात येणार आहे. सिनेमाची पटकथा संजय नवगिरे, कथा अक्षय धर्मपाल, डी आर रसिक कदम, यांची असून संगीत अभय जगताप यांचे आहे.
या चित्रपटाविषयी माहिती देताना सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव म्हणाले, हा चित्रपट युनिव्हर्सल आहे, रहस्यमय असा थरार, वेगळेपण असणार आहे,हॉरर फिल्म असल्याने साठ टक्के शूटिंग रात्री करण्यात आले आहे. सलग ४०दिवस चित्रीकरण सुरू होते.लोकांना असे सिनेमे आवडत असल्याने मराठीत एक वेगळा प्रयोग केला आहे.
——————-
चौकट : ( यांच्या आहेत प्रमुख भूमिका)
या चित्रपटात संदीप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे, प्राजक्ता हणमघर , कुशल बद्रिके, समिता पायगुडे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
——————-
चौकट : ( थ्रिलिंग अनुभवासाठी हा चित्रपट पहावा )
मराठी चित्रपट समृद्ध होत असून आता मराठी भाषेत मुंजा,दशावतार, तुंबाड, काळसेकर आहेत का?, ऐक स सासूचा,सावट, गाढ अंधार,लपाछपी, बाली,झोंबिवली, तुंबाडची मंजुळा असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार होत आहेत. घबाडकुंड हा चित्रपट जागतिक स्तरावर जाणार असून प्रेक्षकांनी वेगळ्या थ्रिलिंग अनुभवासाठी हा चित्रपट जरुर पहावा असे या चित्रपटाचा युवा सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव ( पंढरपूर ) मायबाप प्रेषकांना आवर्जुन आवाहन करतो आहे.
Post Views: 48