
सांगोला – महाराष्ट्र शासनाच्या एमएसबीटीई, मुंबई यांनी घेतलेल्या उन्हाळी वार्षिक परीक्षेमध्ये सांगोला तालुक्यातील मेथवडे येथील सह्याद्री फार्मसीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये द्वितीय वर्ष डी.फार्मसी मधून निकिता चंद्रकांत बाबर व प्रणाली संतोष जाधव-८३.१८, पायल राजेंद्र जाधव-८२.३६, पायल सोमनाथ जाधव-८२.०९ तसेच प्रथम वर्ष डी.फार्मसी मधून मोनिका अतुल ढोले-८०.३०, सानिका प्रशांत पवार-७७.९०, संस्कृती अण्णासाहेब केदार-७७ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले, विश्वस्त विश्वजीत इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी सन्मान करून अभिनंदन केले. हे यश संपादन करण्यास संस्थेचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन, कॉलेजमधील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद यांचे मार्गदर्शन याची मोलाची मदत झाली असे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
Post Views: 60