Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्शीत शांतता कमिटीची बैठक; प्रशासनाची पूर्ण सहकार्याची ग्वाही

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्शीत शांतता कमिटीची बैठक; प्रशासनाची पूर्ण सहकार्याची ग्वाही
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जयंती मिरवणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या सर्व अडचणी व मार्गावरील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.

 ही बैठक शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे, महावितरणचे अधिकारी विनोद घोलप, विक्रम विधाते, तसेच डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी स्पष्ट केले की, जयंती मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर करण्यास सक्त मनाई असेल. त्याऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उत्सवाच्या दिवशी शहरात ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार असून, अवैध दारु विक्रीवर कडक कारवाई करण्यात येईल. मद्यपान करुन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे यांनी सांगितले की, शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांजवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मिरवणुकीच्या दिवशी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले जातील. तसेच, शहरात दोन दिवसांआड नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बैठकीदरम्यान विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे काही सूचना व मागण्या मांडल्या.

माजी नगरसेवक आण्णासाहेब लोंढे यांनी बार्शी हे सर्वधर्मीय सलोख्याने सण-उत्सव साजरे करणारे शहर असल्याचे सांगत प्रशासनाने मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाला पूर्ण सहकार्य करावे, अशी मागणी केली. अजित कांबळे यांनी मिरवणूक मार्गावरील वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच जयंतीच्या आदल्या दिवशी शहरात पाणी सोडण्याची मागणी केली.

नगरसेवक संदेश काकडे यांनी मिरवणूक मार्गावरील अडथळे व अडचणी वेळेवर दूर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अ‍ॅड. विवेक गजशिव यांनी शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.

 दीपक काकडे यांनी मिरवणुकीदरम्यान कोणीही गैरवर्तन केल्यास त्याला तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले. या बैठकीत सोनू भोसले, धीरज बोकेफोडे, शौकत काझी, रुपेश बंगाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन यंदाचा  जयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहात साजरा करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

Post Views: 127
Previous Post

एन.के. किड्स स्कूलचा भावनिक वारावरणात निरोप समारंभ

Next Post

प्लास्टीक साहीत्य खरेदीसाठी निधी खर्च; शासनाच्या नियमाला हरताळ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
प्लास्टीक साहीत्य खरेदीसाठी निधी खर्च; शासनाच्या नियमाला हरताळ

प्लास्टीक साहीत्य खरेदीसाठी निधी खर्च; शासनाच्या नियमाला हरताळ

ताज्या बातम्या

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026
सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

July 3, 2026

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

July 3, 2026
देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

July 3, 2026
महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

July 3, 2026

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0956874

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!