सोलापूर – रोडवर हातामध्ये लोखंडी तलवार घेवुन दहशत माजविणाऱ्या एका व्यक्तीस शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकाला एक इसम संत तुकाराम चौकाजवळील एसटी स्टॅन्ड नं. ०२ चे समोर गुरूनानक चौकाकडे जाणाऱ्या रोडवर हातामध्ये लोखंडी तलवार घेवुन जोरजोरात आरडाओरड करुन सदर ठिकाणी दहशत माजवत आहे.” अशी माहिती मिळाली. त्याअनुषंगाने त्या इसमास शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले.
मोहन नागनाथ पोतु, वय ३७, रा. १६ शास्त्रीनगर, शिवलिंग मंदिराजवळ, सोलापूर असे नाव असल्याचे त्याने सांगीतले. त्याच्या उजव्या हातात असलेली ०२ फुट लांबीची लोखंडी तलवार ताब्यात घेवुन जप्त करण्यात आली. त्या इसमाने बेकायदेशीररित्या अज्ञात उद्देशाने त्याच्या ताब्यात लोखंडी तलवार बाळगली म्हणुन त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पोह/अंकुश भोसले, शैलेश बुगड, पोशि/राजु वाघमारे, अभिजीत धायगुडे यांनी केली.



















