संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सल्ला. महिला वर्ग, तरुण, शेतकरी आणि गरीब वर्ग या चार महत्त्वपूर्ण जाती
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने एकहाती बाजी मारत विरोधकांना पराभवाची धूळ चारली होती. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये चांगले काँग्रेसला यश मिळण्याच अपेक्षा होती. एक्झिट पोल्सकडूनही तसा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, हे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने तिन्ही राज्यांमध्ये घवघवीत यश मिळवले. या पार्श्वभूमीवर आजपासून दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना पराभवाने खचून न जाता भविष्यात सकारात्मक वृत्तीने काम करण्याचा सल्ला
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा
Login / Register


















