सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील सद्गुरू संत बाळूमामा मंदिर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी दिली आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावरील प्रति आदमापूर म्हणून ओळखल्या जाणार्या बेलाटी येथील बाळूमामा मंदिर परिसरात भाविकांची संख्या वाढत आहे. तसेच रविवार, 14 जून रोजी दुपारी 12.20 वाजता अमावास्या प्रारंभ होत असून सोमवार 15 जून रोजी सकाळी 8.24 वाजता अमावास्या समाप्ती होणार असून या निमित्ताने अधिक महिना संपणार आहे. रविवारी व सोमवारी रूद्राभिषेक, भजन, कीर्तन, धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार असून मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच संत बाळूमामा अन्नछत्र येथे दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले.
Post Views: 29