मोडनिंब – यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाच्या विरोधात बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने मोडनिंब (ता. माढा) येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी या धोरणाचा निषेध करत युपीआय क्यूआर कोडची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी युपीआय प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भाजी विक्रेते, चहा टपरी चालक, किराणा दुकानदार तसेच छोटे व्यापारीही क्यूआर कोडद्वारे व्यवहार करतात. अशा परिस्थितीत युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारल्यास त्याचा आर्थिक भार सर्वसामान्य नागरिक व छोट्या व्यापाऱ्यांवर पडू शकतो, अशी भूमिका संघटनेचे सुनील ओहोळ यांनी मांडली.युपीआय व्यवहारांवरील शुल्क तात्काळ रद्द करावे, डिजिटल व्यवहार पूर्णपणे मोफत ठेवावेत आणि छोट्या व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकू नये, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे अध्यक्ष सुनील ओहोळ, राजकुमार लांडगे, राजेश निंबाळकर, उल्हास खरे, प्रमोद गाडे, बापू शिंदे, सतीश वाघमारे, संतोष जानराव, शेखर वाजाळे आदी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























