सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी सुसंवाद संघटनेच्या सहकार्याने ‘एआय आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले . प्रमुख मार्गदर्शक डॉ. योगेश बोराटे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी एआय चा वापर माध्यमांमध्ये कसा होतो आणि तो कसा केला पाहिजे यावर प्रकाश टाकत अनेक उदाहरणेही सांगितले. एआय च्या वापराने पत्रकारांची जबाबदारी ही अधिक प्रभावी आणि ठळक बनली आहे असे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही आधुनिक तंत्रज्ञानातील महत्त्वाची क्रांती असून, तिचा मानवी जीवन, शिक्षण, रोजगार आणि भावनिक जगावर होणारा परिणाम याबाबत या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. गौतम कांबळे, माजी विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, प्रभारी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर श्री सिद्धाराम पाटील, श्री सोमनाथ पवार यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक वृंद आणि पत्रकारितेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने आणि सर्जनशीलतेने वापर करण्याबरोबरच मानवी मूल्ये व भावनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या मार्गदर्शन कार्यक्रमास आजी माजी विद्यार्थी व विद्यमान पत्रकारितेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये दैनिक सकाळचे सहयोगी संपादक श्री. सिद्धाराम पाटील तसेच विधी सभापती महानगरपालिका श्री. सत्यजित वाघमोडे, ॲग्रोवनचे पत्रकार श्री. सुदर्शन सुतार यांचे विद्यार्थी सुसंवाद संघटेकडून सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा आणि त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा दोरकर आणि मान्यवरांचा परिचय डॉ. अंबादास भासके सुसंवाद प्रमुख संघटक तर आभार डॉ. जगताप यांनी व्यक्त केले.
Post Views: 8