बार्शी – श्री विश्व माऊली बहुउद्देशीय आध्यात्मिक वारकरी मुलींची शिक्षण संस्था, बार्शी येथे निर्भया पथक, बार्शी उपविभागाच्यावतीने विद्यार्थिनींसाठी महिला सुरक्षा व कायदेविषयक जनजागृती आणि मार्गदर्शन मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी कीर्तनकार ह.भ.प. कुमारी शिवलीला पाटील होत्या. संस्थेच्या उपाध्यक्षा वर्षा पाटील, सचिव प्रदीपकुमार आगळे, निर्भया पथकाचे प्रमुख पोहेकॉ. बाबासाहेब घाडगे तसेच पोकॉ. भाऊसाहेब महानोर उपस्थित होते.
शिवलीला पाटील यांनी विद्यार्थिनींना अध्यात्म, वारकरी संप्रदाय आणि स्त्री जीवनातील अध्यात्माचे महत्त्व सांगितले. बाबासाहेब घाडगे यांनी निर्भया पथकाची माहिती दिली. पोक्सो कायद्यांतर्गत संरक्षण आणि तक्रार कुठे व कशी दाखल करावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रदीपकुमार आगळे तर आभार वर्षा पाटील यांनी मानले.
Post Views: 7