बार्शी – येथील अमोल इनामदार यांनी अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी येथून पर्यावरण अभियांत्रिकी विषयात दुसरी पीएच. डी. पूर्ण केली आहे. त्यांच्या यशाबद्दल बार्शी शहर व तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अमोल इनामदार हे सध्या अमेरिकेतील टेनेसी राज्यातील मेम्फिस शहरातील एका विद्यापीठात जानेवारी २०२६ पासून प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी राजस्थानमधील जे.जे.टी. युनिव्हर्सिटी येथून सिव्हील इंजिनिअरिंग विषयात पहिली पीएच.डी. पूर्ण केली आहे. अशा प्रकारे सिव्हील इंजिनिअरिंग आणि पर्यावरण अभियांत्रिकी या दोन्ही क्षेत्रांत पीएच.डी. मिळविण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. अमोल यांनी यापूर्वी ओमान देशातील एका विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम केले आहे.
Post Views: 10