टेंभुर्णी – पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या पथकाने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णी जवळ असलेल्या आढेगाव शिवारातील उजनी पाटीला असलेल्यि सदगुरु हॉटेलसमोर ५ मे रोजी रात्री ११ वाजता छापा टाकून ओमीनी कारमध्ये १२१५६० अवैध देशी-विदेशी दारू साठा जप्त केला.
असून याप्रकरणी विठ्ठल बिरा कोळेकर-पाटील, पिंटू विठ्ठल कोळेकर पाटील रा. आढेगाव तालुका माढा या बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की
ओमीनी कारमधून अवैध देशी वेदेशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती परिविक्षाधीन अधिकारी राहुल आत्राम यांनी पथकासह आढेगाव तालुका माढा येथील हॉटेल सदगुरू वर छापा टाकला असता ओमीनी नंबर MH 42 H ०७३१ ही हॉटेलच्या बाहेर लावलेली आढळून आली तपासणी केली असता यामध्ये टॅंगो पंच देशी दारू क्वार्टर ३८२, देशी दारू ढोकी संत्रा क्वार्टर ५२८, देशी दारू सखु संत्रा १७, श्रीपुर ब्रांडी ५१, मास्टर डी लाईट व्हिस्की ५३, मॅकडॉल नंबर वन व्हिस्की ३९, रॉयल स्टैग व्हिस्की ३३ , क्लासिक गोल्ड विस्की १०, इम्पिरियल ब्लू व्हिस्की ९, टू बर्ग बियर ३६ बाटल्या, किंगफिशर बियर २४ बाटल्या अशा एकूण १११८२ बाटल्या १२१५६० रूपये किंमतीचा अवैध देशी वेदेशी दारूचा साठा व १३०००० हजार किंमतीची ओमीनी असा २५१५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी विठ्ठल बिरा कोळेकर-पाटील, पिंटू विठ्ठल कोळेकर पाटील दोघा पिता पुत्रावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भीमराव गोळे हे करीत आहेत.

























