माढा – ध्येय प्रतिष्ठान माढा यांच्या वतीने दिव्यांगांसाठी मार्गदर्शन व शासनाच्या योजना लाभ शिबिराचे आयोजन माढ्यातील ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले होते. या शिबिरास मोठा प्रतिसाद दिव्यांगांकडून मिळाला आहे.
या शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री घेण्यासाठी मिळणाऱ्या १५,००० रुपयांच्या आर्थिक सहाय्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व फॉर्म भरण्याबाबत प्रत्यक्ष मदतही करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, झुंजार नाना भांगे,ध्येय प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरसेवक दिनेश गाडेकर, नगरसेविका संजीवनी भांगे ,नगरसेवक राजू गोटे, शहाजी चवरे, सचिन चवरे,औदुंबर चवरे, समर्थ भांगे, बाळासाहेब चव्हाण, अनिकेत चवरे, दर्शन कदम, रणजीत देवकुळे, दत्ता आंबुरे, संतोष पाडुळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकूण ३७६ दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबिराचे आयोजन नगरसेवक दिनेश गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्येय बहुउद्देशीय समाजसेवी संस्था माढा यांच्या वतीने करण्यात आले.

















