पिलीव – माळशिरस तालुक्यातील दहीगाव जिल्ह्य परिषद गटाच्या जिल्ह्य परिषद सदस्या तथा माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सुविद्य पत्नी संस्कृतीताई सातपुते यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतिपदी निवड झाल्याबद्दल कुसमोड ( लक्ष्मीनगर) येथे फटाके वाजवून तसेच पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे माळशिरस मंडल चिटणीस संजय पाटील, माजी तालुका उपाध्यक्ष तुषार लवटे, सुभाष जाधव, नाथा मदने, सतीश गोंजारी, सुरेश मदने, विनायक मदने ,हनुमंत मदने,विक्रम मदने, सचिन मदने ,राहुल मदने, सुखदेव मदने, वैभव राऊत, सुरज गोंजारी, यल्लापा पवार, कुमार राऊत, दत्तु गारुळे, भैया जाधव, सचिन पवार, सुयश पाटील, शुभम मदने, दादा पाटील, सोहम मदने, यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो _ कुसमोड ( लक्ष्मीनगर) येथे संस्कृतीताई सातपुते यांची समाजकल्याण सभापतिपदी निवड झाल्याबद्दल जल्लोष करताना .



















