सोलापूर – येथील संगमेश्वर महाविद्यालयातील प्रा. रेणुका सुधीर बिराजदार (हुडगी) यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘वाणिज्य व व्यवस्थापन’ या विद्या शाखेत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
प्रा. बिराजदार यांनी ‘A Study on Work Life Balance of Women Teachers in Higher Educational Institutions with Special Reference to Western Maharashtra (उच्च शिक्षण संस्थांमधील महिला शिक्षिकांच्या कार्य-जीवन संतुलनाविषयीचा अभ्यास – विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात)’ या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांच्या संशोधनात महिला शिक्षकांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलनाचे विविध पैलू अभ्यासले आहेत.
या संशोधन कार्यासाठी संगमेश्वर महाविद्यालयातील प्रा. डॉ. आर. एम. खिलारे,प्रा. डॉ. एस. व्ही. शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी, संस्थेच्या सचिव ज्योती काडादी,प्राचार्य डॉ.आर.पी. बुवा,संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. गोठे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
















