पंढरपूर – मराठी विज्ञान परिषद, पंढरपूर तालुका विज्ञान मंडळ व सावरकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सौर उर्जा काळाची गरज या विषयावर शनिवारी (दि.४) व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सौर उर्जा तज्ञ अभय यावलकर हे या मध्ये मार्गदर्शन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी दिली.
या व्याख्याना संदर्भात माहिती देताना मोहिते यांनी सांगितले की, सौरऊर्जा वापर ही काळाची गरज आहे. ऊर्जेचा वाढता वापर हे समृद्धीचे द्योतक आहे.तळागाळातील जनते पर्यंत वीज पोहचावी, शेती व्यवसायाला शाश्वतता प्राप्त व्हावी यासाठी सरकारी योजना अंमलात येत आहे. त्याचा उहापोह आणि सौरऊर्जेचे वास्तव ऐकवणारे व्याख्यान ऐकण्याची संधी पंढरपूर वासियांना या निमित्ताने मिळणार आहे.
सौरऊर्जा काळाची गरज या विषया अंतर्गत भारताची ऊर्जेची गरज.पारंपरिक ऊर्जा वापर,एकदम बदलू नका, आहे त्या ऊर्जेचा कार्यक्षमतेने कसा वापर करता येईल ते पहा.पर्यायी इंधन म्हणून सौरऊर्जेचा वापर सुरु करा. सौरऊर्जेचा फायदा आणि भविष्य काळ.रोजगार निर्मितीला प्रचंड वाव.राष्ट्रीय नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन म्हणजेच तुमचे आमचे भवितव्य. इत्यादी विविध विषयाला स्पर्श करत अभय यावलकर या व्याख्यानातून संबोधित करणार असल्याचे मोहित यांनी सांगितले.
———————-
व्याख्यानाचे ठिकाण आणि वेळ
येथील सावरकर वाचनालय स्टेशन रोड पंढरपूर येथे शनिवार (दि.४) एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्याख्यानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी, विज्ञान प्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन असे देखील आवाहन महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी केले आहे.
——————
व्याख्याते श्री.यावलकरांचा अल्प परिचय
व्याख्याते – अभय यावलकर, सौर ऊर्जा तज्ञ, शिक्षण : बीएससी प्राणीशास्त्र, उल्लेखनीय कार्य – पाठ्यपुस्तक लेखक, एक हजार पेक्षा जास्त व्याख्याने आणि २५०पेक्षा जास्त कार्यशाळा तसेच २०० पेक्षा जास्त विज्ञान खेळणी, वृत्तपत्र लेखन इत्यादी.

















