अक्कलकोट – गेल्या 25 दिवसा पासून जंतर-मंतरवर विद्यार्थी आपले विविध मागण्या घेऊन उपोषण बसलेले आहेत, त्यांच्या मागण्या रास्त असल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी अमानुष लाठी चार्ज च्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुक्याच्या वतीने बंदची हाक दिली होती या बंदच्या हाकेला अक्कलकोट मध्ये शांततेत पाठिंबा मिळाला .
जेष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे 20 दिवसा पेक्षा अधिक दिवसा पासून उपोषणाला बसले होते, नीट पेपर घोटाळा झाल्यापासून मानसिक धक्का बसून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या . या सगळ्या बाबीबाबत मागण्या घेऊन विद्यार्थी शांततेन आंदोलन करत आहेत . मात्र याकडे शासनाचे मोठे दुर्लक्ष झाले आहे .
विद्यार्थी जंतर-मंतरवर संविधानानुसार शांततापूर्ण आंदोलन करीत असताना
सरकार हिटलरशाही प्रमाणे त्यांच्यावर अमानुषपणे निर्दयपणे लाठी चार्ज करतो अश्रू चे नळकांड्या फोडतात महिलांना मारतात लहान लहान मुलांना मारतात या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी,
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती . त्यांच्या हाकेला अक्कलकोट तालुक्यातील तमाम जनतेने व्यापाऱ्याने कष्टकरी यांनी शाळा कॉलेजेस सगळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी विविध सामाजिक संघटनांनी राजकीय पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन कडकडीत बंद पाळण्यात आला .
यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष साहिल कांबळे शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले तालुका महासचिव नागेश हर्वाळकर संतोष बाळ शंकर दादा गायकवाड नरसिंह गायकवाड संघटक बबन गायकवाड तालुका उपाध्यक्ष अमृत सोनकांबळे तालुका उपाध्यक्ष माणिक गायकवाड सचिन गजदाने प्रसिद्धीप्रमुख संदीप गजदाने प्रताप वाघमारे दयानंद गायकवाड लालू बनसोडे तालुका उपाध्यक्ष यशवंत शेटे इंगळे राजकुमार वाघमारे गौतम सीताफळे कृष्णा इंगळे राजकुमार इंगळे सोपान इंगळे शंकर इंगळे कटप्पा सोनकांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून धरमेश प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांना अटक केलेली असून तात्काळ सोडलं पाहिजे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिवाराला मदत मिळाली पाहिजे अशा विविध प्रकारच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला .
Post Views: 11