सोलापूर : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथे आज श्री गणरायाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली.
याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवलकर, गटनेते चेतन नरोटे, गटनेते अमोल शिंदे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, महापालिका अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले.
महापौर विनायक कोंड्याल यांनी श्री गणरायाचे मनोभावे पूजन करून सोलापूर शहराच्या सुख, समृद्धी, शांतता आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सव हा सोलापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा उत्सव असून, या उत्सवाच्या माध्यमातून शहरवासीयांमध्ये बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
Post Views: 11