श्रीतीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील गणेशोत्सव नेहमीच चर्चेत राहिला आहे . जुना अडत बाजार येथील लोकमान्य गणेशोत्सव मंडळाची सर्वात ऊंच आकर्षक मोठी श्री गणेशाची मुर्ती साऱ्या गणेश भक्ताचे आकर्षणाचे केंद्र बिंदु ठरली आहे . मंडळाने भव्य मंडपा वरच प्रभु श्रीराम सीता स्वयंवर ‘ प्रभुरामाचा वनवास ‘ सागर सेतु सिता हरण राम रावण युद्ध आदि प्रभुराम चरित्रातील प्रसंग चित्र साऱ्याचे लक्ष वेधत आहे .
लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे आधारस्तंभ नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे गणेश भक्त कार्यकर्ते गेली पंधरा दिवसा पासून पारंपारिक मैदानी खेळ लेझीम सराव करत आहे . मंडळाची यंदाची भव्य आकर्षक मुर्ती बरोबरच लेझीम भव्य श्री विसर्जन मिरवणुक बहुचर्चित असते . गणेश भक्ताना या भव्य मिरवणूकीची प्रतिक्षा लागून राहिली आहे .
Post Views: 8