श्रीपूर – श्रीपूर पासून अगदी काहीच अंतरावर वाहत असलेल्या भिमा नदी काठावरील नेवरे हे मुळ गांव असणारे परंतू कर्मभूमि म्हणून श्रीपूर मध्ये वास्तव्य गेलेल्या संदीप देशपांडे यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर कार्यकारी संचालक ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या प्रवासात साखर उद्योगात देशात आपल्या नावाचा डंका निर्माण केला आहे .
साखर उद्योगांच्या विकास तसेच जैवइंधन,तंगज्ञानाचा प्रभावी वापर,या अतुलनिय योगदाना बद्दल नुकताच त्यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोशिएशन ऑफ इंडिया (STAI) नवी दिल्ली या भारत सरकार मान्य वैज्ञानिक व औद्योगिक संशोधा संस्थेच्या वतीने सह उत्पादनातील उत्कृष्ठतेसाठीचा प्रतिष्ठित अरुणारा डॉ . पी . जे . मनोहर राव सुवर्णपदकपुरस्कार देवून गौरविणे आले .
गोवा येथिल डॉ . शामा प्रसार मुखर्जी स्टेडियम मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनातील शानदार कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांचे हस्ते संदीप देशपांडे यांना सपत्नीक गौरविणेत आले .
संदीप देशपांडे यांचे कार्यावर नजर टाकता श्रीपूर येथिल चंद्रशेखर विद्यालयात १० वी पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी बीएसस्सी पूर्ण केले तर राहूरी विद्या पिठातून एमएसस्सी पूर्ण केले . या शैक्षणीक कालावधीत त्यांनी नेहमीच बौद्धीक कौशल्यावर शिष्यवृत्या मिळवल्या .
त्यानंतर कर्मभूमितच कै . ज्ञानेश्वरजी आगाशे यांच्या साखर कारखान्यात १९८४ साली अँग्री ओव्हरसिअर म्हणून नोकरीचा श्रगणेशा केला . मिळालेल्या या संधिचे सोने करत त्यांनी उत्तम कामाच्या जोरावर पुढे झालेल्या पांडुरंग कारखान्यात मुख्य शेती अधिकारी म्हणून काम केले .
अंगी असलेले बौद्धीक कौशल्य,नाविन्याचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता त्यामुळे त्यांनी मध्यप्रदेशात जावून तेथिल साखर उद्योगात चुणुक दाखवली . त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा येत संत दामाजी ,कै . अजितदादा पवार यांचा बारामती अँग्रो , कै . गोपीनाथ मुंडे यांचा अंबा सहकारी साखर तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भाऊराव पाटील साखर कारखान्यात काम करत त्या कारखान्यांचा नावलौकीक वाढविला . आज वयाची ६५ वर्ष पूर्ण झाल्यावरही तितक्याच जोमाने व हिरीरीने ते जयवंत शुगर्स तसेच य . मो . कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहात आहेत . एकूणच साखर उद्योगाच्या जडण घडीत त्यांचे योगदान महत्वाचे ठरते . आपल्या प्रदीर्घ सेवेतील कामगिरीत त्यांनी अवसायनात येत असलेल्या कारखान्यांना आपल्या कौशल्याने नवसंजीवनी मिळवून दिली .
त्यांना मिळालेला सुवर्ण पुरस्कार श्रीपूरकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे .