सांगोला – महाविद्यालयाचे सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षाचे मूल्यांकन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नियुक्त केलेल्या समितीमार्फत करण्यात आले. या समितीने महाविद्यालयाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय मूल्यांकन करून महाविद्यालयास अ दर्जाचे मानांकन दिले आहे. महाविद्यालयास एकूण ८१.७५ टक्के गुण प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी दिली. सदर मूल्यांकन करण्यासाठी प्रा.डॉ.विधीन कांबळे यांनी प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय मूल्यांकनासाठी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, प्रा.पी.सी.झपके, संस्था सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, खजिनदार नागेश गुळमिरे यांनी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
चौकट-
सांगोला महाविद्यालय, सांगोला हे महाराष्ट्रभर शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखले जाते. सर्वच पातळीवरती महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे.