Tuesday, August 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे

तरुण भारतbyतरुण भारत
July 27, 2026
in west maharashtra
0
शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा  – “कारगिलच्या रणभूमीवर भारतीय जवानांनी केवळ शत्रूच्या चौक्या जिंकल्या नाहीत, तर त्यांनी भारताच्या स्वाभिमानाची उंची जगाला दाखवून दिली. शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे ही श्रद्धा आहे; मात्र त्यांनी जपलेल्या राष्ट्रासाठी प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक म्हणून जगणे हीच खरी कृतज्ञता आहे. शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, तर जबाबदार नागरिकत्वाने फेडले पाहिजे,” असे भावपूर्ण प्रतिपादन जीवनगौरव पुरस्कार विजेते, महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी-साहित्यिक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य डॉ. सुरेश शिंदे यांनी केले.
आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा आणि यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशकल्याणी सेवाभवन, करमाळा येथे २७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले तसेच सैनिकी, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत करताना प्रा.करे-पाटील म्हणाले की कारगिलचा इतिहास हा केवळ युद्धाचा इतिहास नाही; तो हिमालयाएवढ्या धैर्याचा, मातृभूमीवरील निष्ठेचा आणि मृत्यूलाही पराभूत करणाऱ्या सैनिकांच्या राष्ट्रप्रेमाचा अमर अध्याय आहे. सीमारेषेवर उभा असलेला जवान आपल्या सुरक्षित आयुष्याचा अदृश्य पहारेकरी आहे. त्यामुळे सैनिकांचा सन्मान एखाद्या दिवसापुरता मर्यादित न राहता तो समाजाच्या विचारांचा आणि नव्या पिढीच्या संस्कारांचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.
यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल ‘कारगिल योद्धा जीवनगौरव पुरस्कार२०२६’ प्रदान करून मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.अक्रूर शंकरराव शिंदे यांनी प्रास्ताविकात कारगिल युद्धातील सैनिकांच्या पराक्रमाचा आढावा घेतला. देशाच्या संरक्षणासाठी आपले तारुण्य आणि संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांप्रती समाजाने संवेदनशील राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त ज्येष्ठ नेते मा.श्री.भारतभाऊ शिंदे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष अॅड. बाबुराव हिरडे,स्वातंत्र्यसैनिक परिवाराचे प्रतिनिधी तथा पत्रकार मा. श्री. विवेक येवले, सहाय्यक कामगार आयुक्त मा. श्री. रेवणनाथ भिसले, सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. बाळकृष्ण लावंड यांची मनोगते संपन्न झाली. यावेळेस व्यासपीठावर, शहीद मेजर अमोल निलंगे यांचे वीर पिता अरविंद निलंगे, शहीद जवान नवनाथ गात यांच्या वीर माता गुंफाबाई गात, वारे ताई, शहीद मेजर आप्पासाहेब काटे यांच्या मातोश्री काटे आजी,यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनचे प्रा. कल्याणराव साळुंके, युवा निर्माण अकॅडमीचे गणेश लोकरे, ॲड.दत्तात्रय सोनावणे, प्रा.जयेश पवार, अभियंते अतुल दाभाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा विशेष सन्मान करण्यात आला. करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री.सचिन तपसे आणि टीव्ही-९ चे पत्रकार मा.श्री.शितल कुमार मोटे, प्रसिद्ध गायक प्रवीण अवचर, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथील मा. श्री. प्रताप बरडे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदविणारे माजी सैनिक मा. श्री. पांडुरंग साळवे आणि मा. श्री. बाळासाहेब काकडे यांचा ‘कारगिल योद्धा’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सन्मानावेळी सभागृहाने टाळ्यांच्या गजरात उभे राहून भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत असलेले मा. श्री. हर्षद शिंदे तसेच एमईएसबीचे अभियंता मा. श्री. अमृत महामुनी यांना विशेष युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिस्त, नेतृत्व, साहस आणि देशसेवेची प्रेरणा आत्मसात करणाऱ्या युवा पिढीचे प्रतिनिधी म्हणून मा. श्री. गौरव आकाश पवार, मा. शुभम भरतरी वळेकर, मा. संकेत संभाजी गरड आणि मा. अभिषेक गणेश करकुटे यांना ‘बेस्ट एनसीसी कॅडेट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या समारंभाच्या निमित्ताने कंदर येथील युवा निर्माण अकॅडमीला यशकल्याणी संस्थेकडून एक स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला‌.
यावेळी श्री. प्रवीण अवचर आणि त्यांच्या म्युझिक कंपनीच्या वतीने देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. भारतीय जवानांचा पराक्रम, मातृभूमीची महती आणि तिरंग्याचा अभिमान व्यक्त करणाऱ्या गीतांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला राष्ट्रभक्तीच्या जागराचा स्वर प्राप्त झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विष्णु शिंदे, सचिन नवले आणि किरण ढेरे यांनी केले तर आभार योद्धा करिअर अकॅडमीचे अध्यक्ष सुभेदार मेजर विलासराव नाईकनवरे यांनी मानले.
Post Views: 27
Previous Post

आस्था सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य देत आस्था ने दिले मुलांच्या शिक्षणाला गती

Next Post

सांगोला महाविद्यालयास विद्यापीठाचे अ दर्जाचे मानांकन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सांगोला महाविद्यालयास विद्यापीठाचे अ दर्जाचे मानांकन

सांगोला महाविद्यालयास विद्यापीठाचे अ दर्जाचे मानांकन

ताज्या बातम्या

मिनी राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी कुचन प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांची निवड

August 18, 2026

बार्शीत अल्पवयीन मुलीची छेड; एकावर गुन्हा

August 18, 2026

सांगोला महाविद्यालयात बीसीए भाग-१ प्रवेशाची संधी

August 18, 2026
गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

August 18, 2026
माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

August 18, 2026
शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 18, 2026

बार्शीत घराचे कुलूप तोडून वेल्डिंग साहित्याची चोरी

August 18, 2026

बार्शीत शहरात दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल 

August 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1086793

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!