सोलापूर : येथील वालचंद महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. संयोगिता दत्तात्रय ओव्हाळ हिने बी.ए. पदवी अभ्यासक्रमात अर्थशास्त्र विषयात ९० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभ्यासक्रमात तिने महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
कामगार नेते चांगदेव सोनवणे व सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास श्रीमती शांताबाई साखरे, संगीता ओव्हाळ, राजश्री साखरे, दत्ता ओव्हाळ, सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसाट, भालचंद्र साखरे, प्रा. नवनाथ कुचेकर, प्रसेन्नजीत शिंगे, श्रावण भंडारे, सतीश वाघमारे, आनंद निकाळजे, श्रीकांत विभूते, वैभव साखरे, संकेत ओव्हाळ, भूषणचंद्र साखरे, प्रफुलचंद्र साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संयोगिताच्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संयोगिता ओव्हाळ हिच्या यशामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.
Post Views: 9