माढा : रयत शिक्षण संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील विद्यार्थिनी कु. सायली शेळके हिने बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.
प्रवरानगर येथे पार पडलेल्या पुणे विभागीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत तिने ६९ ते ७५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर सायलीने हे यश संपादन केले आहे. तिला महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पंकज ढमाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे अध्यक्ष मा. संजीव पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम हराळे, प्रा. अशोक लोंढे, प्रा. कैलास शिंदे, शाम साळुंखे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.