सोलापूर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिखर पाहारिया फाउंडेशनच्या वतीने शनिवारी दिनांक 30 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल ऐश्वर्या येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे राज सलगर यांनी दिली
या उपक्रमांतर्गत गरजू व निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी १० शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी १० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे.
समाजातील वंचित व दुर्बल घटकांना शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सलगर यांनी सांगितले.
Post Views: 6