सोलापूर – आकाशवाणी केंद्राजवळील पुंडलिक पाटील टेनिस अकॅडमीत झालेल्या ‘टीपीएल इंडोकिड्स टेनिस स्पर्धेत शौर्य बेंद्रे, ऋषिकेश चव्हाण, ज्योतिश्का अरेकंटी, तनुज संचेती, मृणमयी गायकवाड आणि आर्यन येमूल यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकावले.
सोलापूरमधील ४० हून अधिक युवा टेनिसपटूंनी सहभाग घेत या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले.
लेव्हल-४ प्रशिक्षक इम्रान शेख यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. ही स्पर्धा १०,१२,१४ व १६ वर्षाखालील अशा विविध वयोगटांत झाली.
स्पर्धेच्या मार्गदर्शन सोहळ्याला इंडोकिड्स स्कूलच्या प्राचार्या शिरीन बागवान आणि पुंडलिक पाटील टेनिस अकॅडमीचे संचालक डॉ. सचिन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वसीम शेख, अझान शेख, शोहेब शेख यांनी सहकार्य केले.
स्पर्धेचे विजेते व उपविजेते याप्रमाणे:
१० वर्षाखालील मुले: शौर्य बेंद्रे , अमन शेख.
१२वर्षाखालील मुले: ऋषिकेश चव्हाण, अयान बोल्ली. मुली : ज्योतिश्का अरेकंटी, आराध्या जाधव.
१४ वर्षाखालील मुले: तनुज संचेती, ऋषिकेश चव्हाण. मुली: मृणमयी गायकवाड, आराध्या जाधव.
१६ वर्षाखालील मुले: आर्यन येमूल, तनुज संचेती.
——–
























