Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही अन आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

तरुण भारतbyतरुण भारत
May 8, 2026
in editor
0
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही अन आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.2781485, 0.53953147);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सायंकाळची अल्हाददायक वेळ…. वऱ्हाडी मंडळींची लगबग…. समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांची उपस्थिती आणि सुस्वर मंगलाष्टके अन वरुणराजाची उपस्थिती अशा वातावरणात १० जोडप्यांच्या रेशीमगाठी जुळल्या. निमित्त होते नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचे.

           पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे आणि मित्र परिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर टाकळीकर मंगल कार्यालयात दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा झाला. विवाहाप्रसंगी पावसाच्या हलक्या सरींची बरसात करून जणू वरुण राजानेही नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले.

          याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सोमलिंग घुली महाराज, सिद्धलिंग महाराज, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त वीणा पवार, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, गोविंद काळे, सुमन काळे, संयोजक आणि सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, रजनी काळे यांची प्रमुख उपस्थित होती.

           गुरुवारी सकाळी टाकळीकर मंगल कार्यालयात वधू-वरांच्या देव अक्षता झाल्या. यावेळी वधू-वरांना सफारी, शालू, मणी मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी, पुस्तके देण्यात आली. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, राम तडवळकर, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीपसिंग राजपूत, उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान, सिद्धेश्वर पाटील, राजेंद्र हजारे, बाळासाहेब शेळके, अर्जुन सलगर, डॉ. योगेश राठोड, गोविंद काळे, सुमन काळे, संयोजक नरेंद्र काळे, रजनी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. किट वाटपानंतर सर्व विवाह विधी करण्यात आले. विवाह विधीनंतर सर्व वऱ्हाडिंनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.

          सायंकाळी हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला आहे. त्यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा त्यांनी आयोजिलेला सामुदायिक विवाहाचा सोहळा कौतुकास्पद आहे. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

          आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, नरेंद्र काळे यांनी हा उपक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. हे काम पुण्याचे आहे. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन केले. 

सुग्रास भोजनाचा वराडी मंडळींनी घेतला आनंद 

पुरी, चपाती, पापड, गुलाब जामुन, जीरा राईस, दाल तडका, बटाटा रस्सा भाजी, दही चटणी असा सुरुची भोजनाचा बेत होता.

सजवलेल्या बग्गीतून निघाली वधू-वरांची वरात

सायंकाळी वधू-वरांची सजवलेल्या बग्गीतून जुळे सोलापूर परिसरातून वरात काढण्यात आली. टाकळीकर मंगल कार्यालयापासून सुरुवात झालेली ही वरात शिवदारे महाविद्यालय, भारती विद्यापीठ, विजयपूर रस्ता, अशोक नगर, नेहरू नगरमार्गे पुन्हा टाकळीकर मंगल कार्यालयात विसर्जित झाली.

Post Views: 42
Previous Post

चोरटयांचा बँक ऑफ इंडियाच्या एटीएम वर दरोडा

Next Post

पालखी मार्गावरील झाले आगीने होरपळली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पालखी मार्गावरील झाले आगीने होरपळली

पालखी मार्गावरील झाले आगीने होरपळली

ताज्या बातम्या

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

August 8, 2026

सोलापुरात १५ नोव्हेंबरला मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

August 8, 2026
मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

August 8, 2026
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 8, 2026

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1040852

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!