
सोलापूर : विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नालंदा फाउंडेशन यांचा प्रतिष्ठेचा सह्याद्री रत्न पुरस्कार यावेळी ऋत्विज चव्हाण यांना जाहीर झाला आहे. चित्रकला आणि लेखन याच्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची निवड झाली. हा कार्यक्रम श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे पार पडणार आहे. अमूर्त शैलीची चित्रकला तसेच उत्स्फूर्त लेखनासाठी त्यांना कलारत्न पुरस्काराने प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन सन्मान करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांमधून प्रस्तावना मागून त्यातून उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. सामाजिक आणि कला क्षेत्रातील चित्रकला आणि लेखन कार्याचा आढावा घेऊन हा पुरस्कार देण्यात येतो.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सुनील नाना गोडबोले, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते नितीन धवणे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष मराठी चित्रपट असोसिएशन प्रदेश उपाध्यक्ष राज्याची चित्रपट व सांस्कृतिक विभाग संचालक सॉलिटयुड हॉलिडे, प्रा. डॉ. संदीप सांगळे अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आर्या घारे देऊळ बंद मराठी चित्रपटातील छोटीशी चिमुकली (अभिनेत्री) यांची उपस्थिती असणार आहे.




















