माळशिरस – कृषी व्यवसायाला वरदान ठरणारा मृग नक्षत्राचा पावसाने सुरुवात दमदार केल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळाला .मात्र काही ठिकाणी वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे . खरिपाच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजित तयारी केली असून वेळेत पडलेल्या पावसाने सध्या तरी बळीराजा सुखावला आहे . उन्हाळ्याच्या अखेरीस पाणीटंचाईच्या तोंडावर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर तालुक्यात बहुतांश ठिकाणी बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली .पेरणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे मात्र सध्या सुरुवात चांगली झाल्याने महागाईच्या चक्रव्य होत सापडलेल्या खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे .
खतांचे नियोजन . आवर्तन ..

युरिया -९ हजर ८oo मे टण, उपलब्ध ५ हजार १३८. ६४ मे टण, डि .ए .पी . १ हजार ७४० उपलब्ध १ हजार ४१४.७० , एम ओ पी मंजूर ७४० मे टण उपलब्धता ९३१ .७५ , एस एस पी मंजुरी १ हजार ८८० उपलब्धता २ हजार ४०९ .७५ , कॉम्पेलक्स मंजुर ५ हजार ९८० उपलब्धता ५ हजार ७४२ एकुण मंजुरी २० हजार १४० उपलब्धता १५ हजार ६३६ .८४ मे टण
बिपाणे नोंद .
बाजरी अपेक्षित पेरणी क्षेत्र ५ हजर २ ७८ हे . बियाणे २११ क्वीटल, मका १४ हजार २८५ हे . २ हजार ८५७ क्विंटल , तुर १२१ हे १८ क्विं , मुग ८६ हे १७ क्विं , उडीद ३८ हे १०क्विं , भुईमुग ४२ हे ५० क्विं, अशा पद्धतीने खरीप बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे .
पावसाने वेळेत सुरुवात केली आहे .पेरणीयोग्य पाऊस नाही मात्र पेरणीयोग्य पाऊस पडेल अशी आशा वाटत असल्याने यावर्षी खरीपात बाजरी मक्याची पेरणी जादा होणार आहे याशिवाय ऊस चारा पिकांनाही मोठा प्राधान्य मिळेल त्या दृष्टीने बियाणे व खतांबाबत्ती प्रशासनासह कृषी दुकानांची तयारी पूर्ण झाली आहे .
भीमराव शेंडगे ,अध्यक्ष कृषी दुकानदार संघटना माळशिरस
Post Views: 5