Sunday, May 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उमंग’मधून विद्यार्थ्यांना मिळाल्या करियर गाईडलाईन्स

एसपी सौरभकुमार अगरवाल यांच्याकडून कौतुक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 30, 2024
in top news
0
उमंग’मधून विद्यार्थ्यांना मिळाल्या करियर गाईडलाईन्स
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग, 30 जून (हिं.स.) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इ.8 वी ते 12 वी च्या विद्यार्थी ,पालक ,शिक्षक वर्गासाठी उमंग करिअर मार्गदर्शन मेळावा 2024 हा उपक्रम ग्रामीण भागातील टॅलेंटला विविध क्षेत्राची ओळख करुन देणारा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. कुडाळ येथील सिध्दिविनायक हाॅल येथे एमकेसीएल,रोटरी क्लब ऑफ कुडाळ व सिंधुसंकल्प अकादमी कुडाळ आयोजित उमंग करिअर मार्गदर्शन मेळावा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शनिवारी झालेल्या हा मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या करियर मार्गदर्शन मेळाव्यातून विद्यार्थ्यांना करियर विषयी गाईडलाईन्स मिळाल्या.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रोपट्याला पाणी घालून या उमंग २०२४चे उदघाटन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे ,अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले ,रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासीर बोरसादवाला, नामवंत डाॅक्टर अमेय देसाई, एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष दिनेश आजगावकर,सेक्रेटरी डाॅ संजय केसरे,असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे,संजय पुनाळेकर, सचिन गावडे, गजानन कांदळगावकर,रोटरी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष ॲड.राजीव बिले, नीता गोवेकर, शशिकांत चव्हाण, सचिन मदने, अभिषेक माने, संजय पिंगुळकर, एकनाथ पिंगुळकर, अमित वळंजू, डाॅ.संजय सावंत, सिंधुसंकल्प अकादमीचे केदार देसाई, भूषण तेजम, सावन जळवी, तेजस पिंगुळकर, प्रीती नेमळेकर आणि अयोध्या नाटकातील कलाकार तसेच एम के सी एल रिजनल मॅनेजर तुषार निकम , मंगेश जाधव, सारथीचे श्री. पाटील व उमेश निकम, सौ सई तेली, का.आ.सामंत ,प्रणाली मयेकर ,डाॅ.विद्याधर तायशेट्ये ,कुडाळ हायस्कूल प्राचार्य दिनेश आजगावकर विघ्नेश खांडेकर, स्नेहल गावडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी यूपीएससी बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुंबई येथील नामवंत डॉक्टर अमेय देसाई यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात पुढे काय करावे, यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे गव्हर्नर नासिर बोरसातवाला यांनी रोटरी लीडरशिप युथ अवार्ड अर्थात राहिलाच्या माध्यमातून रोटरी विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे कार्य करते, याची सर्वांना माहिती दिली. बॅरिस्टर नाथ पै कॉलेज मधील प्राध्यापक प्रणाली मयेकर यांनी नर्सिंग मधील विविध करियर्स याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर तरुण भारतचे पत्रकार राजेश मोंडकर यांनी पत्रकारितेमधील यशस्वी करिअर याबाबतीत विद्यार्थ्यांना संबोधित केले.

एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी करिअर कसे निवडावे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समाजात झालेला वापर यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर संजय सावंत यांनी सुरुवातीलाच पॅरामेडिकल कोर्सेस याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. उद्योजक नितीन वाळके आणि अत्यंत खुमासदार पद्धतीने विद्यार्थ्यांना पठडी बाहेरील करिअर्स यावर मार्गदर्शन केले. करियर घडवताना येणाऱ्या समस्या आणि त्याचा निराकरण कसे करावे, यासंदर्भात कुडाळच्या पोलीस निरीक्षक श्रीमती मृणाल मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते केदार देसाई यांनी अभिनय आणि त्यातील करिअर याबाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुडाळचे तहसीलदार वीरसिंह वसावे यांनी एमपीएससी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील गणित तज्ञ शिवानंद भिडे यांनी गणित विषयावर अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. कणकवली येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर विद्याधर तायशेटये यांनी मेडिकल फील्ड मधील करिअर्स यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि गोवा येथील नामवंत मोटिवेशनल स्पीकर रोटेरियन सुभाष साजणे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असं उत्तम मार्गदर्शन केले.

करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असे एम के सी एल करिअर ॲपचे लोकार्पण व करिअर मंत्र वार्षिक माहितीपत्रक प्रकाशन सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांचे हस्ते करण्यात आले. तसेच एम के सी एल ऑलंपियाड मूमेंट (माॅम) स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नृत्य दिग्दर्शक भूषण बाक्रे, शंकर तेजम, तेजस पिंगुळकर, सावन जळवी आदी उद्यान्मुख कलाकारांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा उपक्रमामध्ये सहभागी होऊन स्वकमाईतून 36 विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कृतज्ञतापर भेटवस्तु दिल्याबद्दल सहभागी विद्याथ्र्यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी सारथीचे श्री पाटील आणि सहकारी उपस्थित होते. यावर्षी नीट मध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या सिद्धी शिवानंद भिडे हिचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी इव्हेंट चेअरमन संजय केसरे, एमकेसीएलचे तुषार निकम, कोकण रिजनचे समन्वयक मंगेश जाधव, यांच्या विशेष प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून विद्यार्थ्यांचा उत्तम प्रसिसाद लाभला. सूत्रसंचालन सचिन मदने, निलेश गुरव व देवेंद्र गावडे ,मंगेश गुरव यांनी केले.

Post Views: 63
Previous Post

भंडाऱ्यात अनियंत्रित कार उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली; दोघे ठार

Next Post

रोहित शर्मा, विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रोहित शर्मा, विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती

रोहित शर्मा, विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती

ताज्या बातम्या

पशू-पक्ष्यांसाठी ‘मायाचा ओलावा’: एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम

पशू-पक्ष्यांसाठी ‘मायाचा ओलावा’: एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम

May 3, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा १२वी चा निकाल ९१.९५ टक्के

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा १२वी चा निकाल ९१.९५ टक्के

May 3, 2026
पालकांच्या सेवानिवृती नंतरचे दायीत्व मुलांचेच – डॉ . कुलकर्णी

पालकांच्या सेवानिवृती नंतरचे दायीत्व मुलांचेच – डॉ . कुलकर्णी

May 3, 2026
पिरॅमिडसाठी कायम मदत करणारच – प्रथमेश कोठे

पिरॅमिडसाठी कायम मदत करणारच – प्रथमेश कोठे

May 3, 2026
नेताजी महाविद्यालयाचा बारावीचा ९०.२७ टक्के निकाल

नेताजी महाविद्यालयाचा बारावीचा ९०.२७ टक्के निकाल

May 3, 2026
शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इ.12वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इ.12वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 3, 2026
वाहतूक कोंडी व पार्किंग विषयी अकलूजमध्ये बैठक 

वाहतूक कोंडी व पार्किंग विषयी अकलूजमध्ये बैठक 

May 3, 2026
बाल उद्यानाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न

बाल उद्यानाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न

May 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0842914

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697